बये जरा जपुन

थोड्याच दिवसात आताIndian-Politics1

थंडावेल सगळ्यांचा प्रचार

सगळ्यांनीच चित्र सुंदर भासविले

पण प्रामाणिक नाहित विचार……..

सभा, भाषणे, नेटवर्क पर्यन्त

झाला ” थ्रि डी” चा विकास

हि लोकशाहीची प्रगती म्हणावी

कि नुसता आहे आभास……

जाती, धर्म आणि पंथ

यात वाटले मत सगळे

वर्षा नु वर्ष कुजविले आम्ही

विशाल लोकशाहीची मूळे……

लोकसभा आमची तरुण झाली

झाली सोळा वर्षाची

बये जरा जपुन राहशिल

ती सभा असते जणु कौरवांची…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *