browser icon
You are using an insecure version of your web browser. Please update your browser!
Using an outdated browser makes your computer unsafe. For a safer, faster, more enjoyable user experience, please update your browser today or try a newer browser.

मनाचा गोडवा

Posted by on September 10, 2017
स्मृतिगंध..

Padmajatai Phenani

मुंबई म्हटली कि गर्दी, आवाज, आणि जीवघेणा गोंधळ . माणसांच्या गर्दीतला आपणही एक भाग असतो. अशा माणसांच्या गर्दीत माणूस सापडणे कठीण!. बाजार फुलांचा आहे तरी सुगंध सापडत नाही. कारण माणसाची कुत्रीमता आता कुत्रिम फुलांपर्यंत आली आहे. अशा कुत्रिम जगात कुठेतरी एका कोपऱ्यात आपुलकी जपणारे,नातं जोडणारे, मनाचा साधेपणा ठेवणारे, जिव्हाळ्याची वाटावीत अशी माणसे बघितली कि पुन्हा एकदा “माणूस” म्हणून आपण जगत आहोत यावर विश्वास बसतो.
स्मृतिगंध म्हणजे हाच गंध पुन्हा पुन्हा अनुभवयाचा!. हरिभाऊ विश्वनाथ मुसिकल्सशी मान्यवर,दिग्ज लोकांनी आपले नाते जोडले . त्यांच्या गोड आठवणी आहेत. त्यातलीच एक खूप गोड आठवण तुम्हां सोबत मनमोकळेपणे मंडित आहे.
२००० सालची हि घटना. मी दादरला जात होत. गजबजलेल्या दादर मधला रानडे रोड . रोड फक्त नावालाच. कारण तिचे भाजीवाले, फेरीवाले कायम , बसलेले!. त्यातून मार्ग काढीत जाणाऱ्या   गाड्या आणि त्यांचा तो कर्कश हॉर्न .
मी जरा घाईतच होते. तसेही मुंबईची माणसं म्हंटले कि सदा ना कदा घाईतच . त्यांची घड्याळं मनगटीवर नाही तर मानगुटीवर असतात . कधी कधी घाई नसली तरी दाखवावी लागते कारण आपण मुंबईत आहोत याच ते लक्षणं ! तर त्या दिवशी मी घाई घाईने मार्ग काढीत जात होते. अचानक मला कोणीतरी हाक मारली. तो आवाज मधुर होता. ती हाक एकदम मनाला भिडली . मी थांबले . मला या गर्दीत कोण बोलवते ? असा विचार करून मी मागे वळले . बघते तर काय प्रत्यक्ष स्वरचंद्रिका मला आवाज देत होती. ती मधुर हाक मला पदमश्री पदमजा फेनानींनी दिली होती. माझा विश्वासच बसेना. मी थांबले, भांबावले, गोधळे !. एक भारदस्त व्यक्तिमत्व मला हात हलवून बोलवत होते. आम्ही दोघी एकमेकांच्या विरुद्ध दिशेला उभे होतो.
मी अर्धा रस्ता ओलांडला आणि पदमजाताईंनी अर्धा. पदमजाताईंना बघून मी भारावून गेले . आम्ही दोघी रस्त्यात भेटलो .रस्त्याच्या बाजूला उभं राहून आम्ही बोलायला लागलो. हरिभाऊ विश्वनाथाच्या अमृतमोहत्सवाचे निमंत्रणाची आठवण ठेवत त्या बोलायला लागल्या .पदमजाताई म्हणजे साक्षात सरस्वतीच देणं . अशा असामान्य व्यक्तीने माझी ओळख ठेवली होती. आजूबाजूचे लोक, गर्दीचे भान न ठेवता पदमजाताईं माझ्याशी बोलायला उत्सुक होत्या.
पदमजाताईंनी भरभरून कौतुक केलं. त्यांच्या विशाल हृदयातून आलेले शब्द म्हणजे मला सरस्वतीच्या आशिर्वादासमान होते. त्यांच्या मनाचा मोठेपणा, साधेपणा पाहून मी आनंदाने भारावले. माणूस कितीही मोठा झाला तरी आपला साधेपणा, मोठेपणा कसा जपून ठेवतो हे मी पदमजाताई कडून अनुभवले. माझा हा अनुभव म्हणजे माझ्या साठी एक खूप मोठी जीवनाची शिदोरी आहे.
आज मी या स्वरचंद्रिकायेची सखी आहे आणि मनोमन सुखी सुद्धा !
“गोड गळ्याच्या साथीला
साधेपण देतो गोडवा
मनाचा मोठेपणा आणतो
मायेचा, जिव्हाळ्याचा ओलावा”
पद्मा दिवाने

Comments are closed.

Powered by Aaliya Enterprise