browser icon
You are using an insecure version of your web browser. Please update your browser!
Using an outdated browser makes your computer unsafe. For a safer, faster, more enjoyable user experience, please update your browser today or try a newer browser.

When I Met a Talented Photographer…

Posted by on September 6, 2017

एक गुणी फोटोग्राफर …

“जे ना देखे रवी
ते देखे कवी”
अशी आपल्या कडे म्हण आहे. कवी सगळं काही बघू शकतो. जे दिसत ते आणि जे दिसत नाही ते ही . आपल्या आजू बाजूला जे दिसत किंवा ज्या काही सूक्ष्म हालचाली सुरु असतात त्या आपण डोळ्यांनी टिपू शकत नाही. अशा वेळेस कमी येतो तो कॅमेरा .कॅमेरा म्हणजे तिसरा डोळा .

या डोळ्यांनी जे काही टिपता येईल ते टिपतो आणि आठवण म्हणून जपतो!. कॅमेरा जेवढा महत्वाचा तेवढाच तो फोटोग्राफर सुद्धा . फोटोग्राफी एक कला आहे. ती शिकता येते, मान्य आहे पण त्यात्यासाठी काही उपजत गुण असावे लागतात. असा एक उपजत गुणी, तरुण फोटोग्राफर मला योग योगाने भेटला.
शुभम सर्जेराव यादव असे या गुणी फोटोग्राफरचे नाव.

आम्ही इस्लामपूरला गेलो होतो, तेव्हा या कलाकाराची भेट झाली. त्याचे सुंदर , सूक्ष्म अजोड फोटो बघितले आणि मी या तरुण फोटोग्राफरच्या कलेने चकितच झाले. त्याला देवाने काही तरी खास दिल आहे. म्हणूनच तो अत्यन्त बारीक बारीक, सध्या गोष्टी आपल्या कॅमेरात बंद करतो.

ते बघताना वाटत निसर्ग किती सुंदर आहे. कधी वाटत सध्या गोष्टीत हि एक गंमत दडली असते. कधी वाटत जनावरांना हि भावना व्यक्त करता येतात.
शुभम इंजिनियर होतोय पण त्याने आपली संवेदना ,भावना, धैर्य सगळं काही फोटोत ओतल्याच जाणवत . अशा नव्या तरुण फोटोग्राफरची क्षमता पाहून खरं म्हटलं तर मी त्याच्या प्रेमातच पडले. प्रेम म्हणता येणार नाही पण त्याच्या फोटोतल्या भावना माझ्या मनाला कुठेतरी भिडल्या आणि विचार आला, या बंदिस्त भावनांना शब्दांच्या रूपाने व्यक्त करावे आणि हि कल्पना प्रत्यक्षात आली.

शुभमने आपला हा छंद असाच जोपासावा आणि जग आपल्या व कॅमेराच्या मनात टिपत रहावे, स्वछद आनंदाचा स्वाद घेत रहावा हीच इच्छा

Shubham Yadav

Comments are closed.

Powered by Aaliya Enterprise