browser icon
You are using an insecure version of your web browser. Please update your browser!
Using an outdated browser makes your computer unsafe. For a safer, faster, more enjoyable user experience, please update your browser today or try a newer browser.

संताना अभिप्रेत असलेली नीती…

Posted by on August 3, 2011

एकंदरीत असाच अर्थ काढावा लागेल की आपले जीवन जगत असतांना, पहिल्यांदा दुस-याच्या जीवनाचा विचार करुन, त्या प्रमाणे वागणे यालाच नीतीमत्ता म्हणता येईल.

अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णला प्रश्न केला की मी माझ्या भाऊ, गुरु, नातवंड, वडिलधा-या मंडळीना मारुन, राज्यभोग केला तर ते एक प्रकारचे पापच आहे. पण श्रीकृष्णाने त्याचा हा मोहरुपी क्षण जावा म्हणून गीता सांगितली. त्याला प्रथम क्षत्रिय म्हणून तुझे लढणे कर्तव्य आहेच पण अधर्मा विरुध्द लढत असतांना तुला आपले कर्तव्य करावेच लागेल याची त्याला जाणीव करुन दिली.

समजा आपण एखाद्या रसत्याने जात असतांना चार चौघे एखाद्याला मारायला येत असतील आणि आपल्याला माहित अहे की तो माणुस कुठे लपलाय पण तरी सुध्दा आपण तेव्हा खोटं बोलतो आणि त्या माणसाची रक्षा करतो. खोटं बोलण हे पाप आहे ही एक बाजु झाली पण त्याच क्षणी आपण खोटं बोलून एका जीवाची रक्षा केलेली असते. म्हणजेच असे म्हणता येऊ शकते की नीती किंवा अनीती ही त्या त्या स्थितिवर अवलंबून असते. ज्या क्षणी आपण असे म्हणतो की नीती आहे, त्याच क्षणी ती अनीती होऊ शकते किंवा ज्या क्षणी आपण अनीती आहे असे म्हणतो त्याच क्षणी ती नीती होऊ शकते. [क्रमशः]

Comments are closed.

Powered by Aaliya Enterprise