browser icon
You are using an insecure version of your web browser. Please update your browser!
Using an outdated browser makes your computer unsafe. For a safer, faster, more enjoyable user experience, please update your browser today or try a newer browser.

ज्ञानेश्वरीचे प्रयोजन…

Posted by on July 30, 2011

ज्ञानदेव गीतेवर टिका करण्यास का प्रवृत्त झाले व असा प्रश्न उपस्थित करून त्याची यथा संभव उत्तरे देण्याचा प्रयत्न अनेक विचारवंतांनी केला आहे. “शांभव अद्वयांनद वैभव देऊन कलीकडून गिळल्या जाणा-या जीवांना मुक्त कर” अशी आज्ञा गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना केली. तेव्हा कलीने ग्रासलेल्यावर निवृत्तिनाथरुप कृपाळू मेघाने जी शांतरसाची वृष्टी केली तोच हा आपला ग्रंथ असे ज्ञानदेवाने सांगितले आहे.

कली म्हणजे कलह, पाप, दुराचार. तत्कालीन समाजात माजलेला अधर्म नष्ट करून सदाचार, नीती व धर्माची वृष्टी लोकांवर करावी हा ज्ञानदेवांचा मुख्य हेतू होय. पसायदानात ही “दुरितांचे तिमिर जावो । विश्वस्वधर्मसूर्य पाहो़ ।”[ज्ञाने. १८.१७९५] हेच मागणे ते मागतात आणि विश्वाचे प्रभुराय श्री निवृत्तिनाथ “हा होईल दानपसावो” असे आश्वासन देतात. यावरून ज्ञानदेवांचे ग्रंथ प्रयोजन स्पष्ट होते. त्यांनी चार ही वर्णाना सुलभ असणारी गीता टीके साठी निवडली. त्यांना या जगात ब्रम्हविद्धेचा सुकाळ करावयाचा होता आणि जगात आनंदाचे आवार मांडावयाचे होते, म्हणुनच ते म्हणतात “अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक”. “घेणे देणे सुख चि वे-ही । जगा हो देइं । [ज्ञाने. १२.१६] असेच ते गुरुस विनवितात. ज्ञानदेवांना लोकोध्दार साधावयाचा होता हे या वरुन दिसून येते.

Comments are closed.

Powered by Aaliya Enterprise