browser icon
You are using an insecure version of your web browser. Please update your browser!
Using an outdated browser makes your computer unsafe. For a safer, faster, more enjoyable user experience, please update your browser today or try a newer browser.

गीतेची निवड…

Posted by on July 23, 2011

गीता ही सर्व उपनिषदांचे सार व सर्व शास्त्रांचे माहेर होय. गीता हे एक नीतीशास्त्र आहे, अस सांगतांना त्यांनी अतिशय सुंदर उदाहरण घेतले आहे. जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला नीतीविषयक प्रश्नकेला तेव्हा श्रीकृष्णाने ” अर्जना तू क्षत्रिय आहेस, लढणे हे तुझे कर्तव्य आहे. तू लढ” एवढे उत्तर दिले असते तरी सुध्दा काम भागले असते.

पण श्रीकृष्ण गुरु मिळाल्याचा उपोयोग काय ?. ज्ञानेश्वर महाराजांची पाहण्याची जी दृष्टी आहे तिचे मर्म त्यातच आहे. भगवतांनी तात्पुरती शंका फेडली असती तर ते शास्त्र झाले नसते, हा विचार ज्ञानदेवांनी एक दृषटांत देऊन फारच उत्कृष्ट मांडला आहे. ते म्हणतात,

“नातरी असाध्य देखोनि व्याधि ।

अमृतासम दिव्य औषधी ।

वैद्यसूची निरवधि । निदानींची ।”[२.८६]

देवाने नुसता तात्पुरता अर्जुनाची अडचण दुर करण्याचा मार्ग स्वीकारला नाही, तर अर्जुनाला अशी अडचण पुनः पडू नये असे सांगण्यास आरंभ केला व म्हणूनच ‘गीताशास्त्र’ निर्माण झाले. हे जीवनांतील धर्मा-धर्म, कर्तव्य- अकर्तव्य या महत्तवाच्या प्रश्नांचा विचार करणारे नीतीशास्त्र अथवा जीवनशास्त्र आहे. ते म्हणत हा जीवनाचा ग्रंथ, म्हणजे गीता ही नुसती वाचायची, समजून घ्यायची एवढेच नव्हे तर अनुभवायची, जगावयाची असा ग्रंथ आहे. श्री अरंविदाच्या भाषेत बोलायचे तर दैवी गुरु व मानव शिष्य यांची अलौकिक जोडी जमली व म्हणूनच त्यांतून अमर अशी गीता निर्माण झाली.

 

 

Comments are closed.

Powered by Aaliya Enterprise