browser icon
You are using an insecure version of your web browser. Please update your browser!
Using an outdated browser makes your computer unsafe. For a safer, faster, more enjoyable user experience, please update your browser today or try a newer browser.

माऊलीच्या चरणी..

Posted by on July 11, 2011

आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या संताना नामन करुन “ज्ञानेश्वरीतिल नीती विचार”.. ह्या वर माझे स्वतःचे विचार प्रगट करण्याचा प्रयत्न करित आहे. अर्थात ‘ज्ञानेश्वरीवर” काही ही टिपनी करण्याची माझी क्षमता नाही. तरी सुध्दा मला जे कळले, गवसले आणि समजले ते तसेच्या तसे आपणा पर्यंन्त पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करित आहे. आशा आहे माझी कुठली ही चुक आपण वाचक पोटात घ्याल आणि मला पुढे अशीच प्रेरणा देत रहाल..

ज्ञानदेवांची क्षमा मागून त्यांच्या विचारांना परत लोकांपर्यन्त पोहवित आहे.. माझे शब्द तोडके आहेत, याची जाणिव मला आहे, माझ्या शब्दांची ही पुष्पमाला ज्ञानदेवांच्या चरणी अर्पण करित आहे..

१३ व्या शतकात वारकरी व नाथ असे दोन पंथ निर्माण झाले. ज्ञानदेवांनी भागवत म्हणजे वारकरी पंथाला उजाळा दिला. “अन्यावर वार करणारा असा तो वारकरी” अशी वारकरी संप्रदयाची व्याख्या केली जाते. पण त्या काळात ह्या वारकरी पंथाला स्वतःचा असा आचार धर्म नव्हता. ज्ञानदेवामुळे तो सामान्य जनांपर्यन्त जाऊन पोहचला. आणि त्यांनी सर्वांची मने आपणा कडे अकर्षूण घेतली. या वारकरी पंथाचा पाया घातला तो ज्ञानभास्कर ज्ञानदेवाने. संत बहिणाबाई म्हणतात …”

“ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया

नामा तयाचा किंकर, तेणें केला विस्तार

जनार्दन, एकनाथ, खांब दिला भागवत

संतकृपा झाली, इमारत फळा आली

तुका झालासे कळस, भजन करा सावकाश”

प्रवरेच्या काठी असलेल्या म्हळसापूर किंवा नेवासे मुक्कामी शके १२१२ त ज्ञानदेवांनी श्रीमद्-भगवतगीते वरील आपला अलौकिक टिकाग्रंथ पूर्ण केला. “उपमा, भाषा सौंदर्य, तत्वज्ञान, साक्षात्कार, भक्ती व अदैव्त याची सांगड, अलौकिक निरिक्षण शक्ती, अप्रतिहत कवित्वशैली, अलोट वाड्ःमाधुर्य या सर्व गुणांच्या संमिश्रणाने “ज्ञानेश्र्वरी” हा ग्रंथ “न भूतो न भविष्यती” असे म्हणावयास हरकत नाही. प्रा. रा.कृ. लागू म्हणतात “जगाच्या वाड्ःमयांतील अत्युच्च श्रेणीतिल कोणत्याही काव्याची बरोबरी करु शकेल इतकी या ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेची थोरवी आहे…[क्रमशः]

Comments are closed.

Powered by Aaliya Enterprise